पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना कारपूलिंग करून इंधन वाचवण्याचे केले आवाहन
नवी दिल्ली , 28 मे (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान मंत्र्यांना कार पूलिंगचा अवलंब करण्याबाबत आणि इंधन बचतीसंदर्भात महत्त्वाचा संदेश दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “जेव्हा आपण एकाच ठिकाणा
पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना कारपूलिंग करून इंधन वाचवण्याचे केले आवाहन


नवी दिल्ली , 28 मे (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान मंत्र्यांना कार पूलिंगचा अवलंब करण्याबाबत आणि इंधन बचतीसंदर्भात महत्त्वाचा संदेश दिला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “जेव्हा आपण एकाच ठिकाणाहून निघतो आणि एकाच ठिकाणी जाणार असतो, तेव्हा आपण कार पूलिंगचा पर्याय का निवडू नये?” पंतप्रधानांची ही टिप्पणी अशा वेळी आली, जेव्हा अनेक मंत्री वेगवेगळ्या वाहनांतून बैठकीसाठी पोहोचले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी अलीकडच्या काळात आपल्या सुरक्षा ताफ्याचा आकारही कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मंत्र्यांनाही त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सरकारकडून नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यासाठी तसेच सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात बहुतांश मंत्र्यांनी आपल्या सुरक्षा ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आहे.

याशिवाय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना जनतेशी अधिक संवाद साधण्याचा आणि लोकांमध्ये वेळ घालवण्याचा सल्ला दिला, जेणेकरून सरकार आणि नागरिकांमध्ये अधिक चांगला संवाद निर्माण होईल. यावेळी त्यांनी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अलीकडील जनसंपर्क मोहिमेचेही कौतुक केले. सिक्कीम दौऱ्यादरम्यान ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्थानिक नागरिकांशी नेपाळी भाषेत संवाद साधून सर्वांना प्रभावित केले होते.

दरम्यान, पंतप्रधानांच्या या संदेशाचा प्रभाव बुधवारी संध्याकाळी दिसून आला. अनेक राज्यमंत्री एकाच गाडीतून कर्तव्य भवन-३ येथे पोहोचले आणि तेथून आयोजित प्रगती बैठकीत व्हर्च्युअल माध्यमातून सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande