जळगावात वाळू माफियांवर मोठी कारवाई; 1700 ब्रास अवैध वाळू जप्त
जळगाव, 28 मे (हिं.स.) : जिल्ह्यात अवैध वाळू साठ्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे तब्बल 1,700 ब्रास वाळू जप्त केली आहे. ही कारवाई जळगाव पोलिसांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे. मिळालेल्य
जळगावात वाळू माफियांवर मोठी कारवाई; 1700 ब्रास अवैध वाळू जप्त


जळगाव, 28 मे (हिं.स.) : जिल्ह्यात अवैध वाळू साठ्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे तब्बल 1,700 ब्रास वाळू जप्त केली आहे. ही कारवाई जळगाव पोलिसांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निमगव्हाण गावातील दादाजी धुनीवाले मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा करून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देत महसूल विभागालाही कारवाईत सहभागी करून घेतले.

पोलिस आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून संपूर्ण अवैध वाळू साठा ताब्यात घेतला. सध्या जप्तीची कायदेशीर प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.

जप्त करण्यात आलेली 1,700 ब्रास वाळू जिल्ह्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या साठ्यांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. बाजारमूल्यानुसार या वाळूची किंमत लाखोंच्या घरात आहे.

या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांनी पोलिसांच्या या धडक कारवाईचे स्वागत केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.

--------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande