सिद्धरामय्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा
- शुक्रवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बंगळुरू, 28 मे (हिं.स.)। कर्नाटकमधील सत्ताधारी काँग्रेस सरकारमध्ये आज मोठा राजकीय बदल झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी डीके शिवकुमार हे पुढील
सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा


- शुक्रवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक

बंगळुरू, 28 मे (हिं.स.)। कर्नाटकमधील सत्ताधारी काँग्रेस सरकारमध्ये आज मोठा राजकीय बदल झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी डीके शिवकुमार हे पुढील मुख्यमंत्री होणार, असे जवळपास निश्चित मानले जात आहे. आता शुक्रवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीची औपचारिकता पार पडणार आहे.

सिद्धरामय्या यांनी लोकभवनात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राज्यपाल कार्यालयात आपला राजीनामा सुपूर्द केला. शुक्रवारी कर्नाटकमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यात नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार आहे. मात्र, डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमारही उपस्थित होते.सिद्धरामय्या म्हणाले, “माझ्यासाठी राज्यहित सर्वांत महत्त्वाचे आहे.” तसेच त्यांनी सांगितले की, “माझ्या या निर्णयाला सर्व आमदारांचा पाठिंबा आहे.”

पत्रकार परिषदेत सिद्धरामय्या म्हणाले, “हायकमांडने यापूर्वीच राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार मी आज माझा राजीनामा सादर केला आहे. राज्यपाल परतल्यानंतर ते माझा राजीनामा स्वीकारतील, असा मला पूर्ण विश्वास आहे, कारण हे संविधानानुसारच होणे आवश्यक आहे.” सिद्धरामय्या म्हणाले, “राज्यपाल सध्या बंगळुरूमध्ये नाहीत. त्यांच्या कार्यालयाने मला सांगितले की ते आज उशिरा रात्री परतणार आहेत. त्यामुळे मी माझा राजीनामा त्यांच्या सचिवांकडे सुपूर्द केला आहे. राज्यपाल परत आल्यानंतर ते माझ्या राजीनाम्याला मंजुरी देतील, असा मला विश्वास आहे आणि त्यांनी तसे करणे आवश्यकही आहे.” त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “माझ्यासाठी राज्याचे हित सर्वांत महत्त्वाचे आहे.”

सिद्धरामय्या म्हणाले, “आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची परवानगी देणे हे पूर्णपणे घटनात्मक आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande