गोदरेज प्रोफेशनलने लाँच केले व्हाइब कलेक्शन; हेअर स्टायलिस्ट्सचे कौशल्य वाढवण्याचे उद्दिष्ट
मुंबई, 28 मे (हिं.स.)। हेअर केअर, कलर, स्टायलिंग आणि ट्रीटमेंट्स या क्षेत्रातील गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा (GCPL) उत्पादने सादर करणारा व्यावसायिक हेअर ब्रँड, गोदरेज प्रोफेशनलने कलर प्ले द्वारे समर्थित आपले नवीन, ट्रेंड-फॉरवर्ड हेअर कलर कल
गोदरेज


मुंबई, 28 मे (हिं.स.)। हेअर केअर, कलर, स्टायलिंग आणि ट्रीटमेंट्स या क्षेत्रातील गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा (GCPL) उत्पादने सादर करणारा व्यावसायिक हेअर ब्रँड, गोदरेज प्रोफेशनलने कलर प्ले द्वारे समर्थित आपले नवीन, ट्रेंड-फॉरवर्ड हेअर कलर कलेक्शन व्हाइब सादर केले आहे. मुंबई आणि देशभरातील प्रमुख सलून्समध्ये हे कलेक्शन उपलब्ध आहे. कलर प्ले ही गोदरेज प्रोफेशनलची कार्यक्षम कलर सिस्टीम आहे, जी केसांचे पोषण करून त्यांचे आरोग्य जपतानाच, आकर्षक चमक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या कलरसह ट्रेंड-फॉरवर्ड शेड्स देण्यासाठी डिझाइन केली आहे.

नवीन हेअर कलर कलेक्शनमध्ये तीन वेगळे, ट्रेंडनुसारचे लूक्स एकत्र आणले आहेत. पहिला लूक ‘केऑस मोड’ आहे, जो धाडसी आणि निर्भीड व्यक्तिमत्त्वांसाठी डिझाइन केलेल्या कूल-टोन्ड बेज ब्लॉन्ड्समुळे उठून दिसतो. दुसऱ्या लूकला ‘सॉफ्ट लॉन्च’ म्हटले जाते, जो रिच, डायमेन्शनल ब्रुनेट ब्लेंड्सद्वारे शांततेची पुनर्कल्पना करतो. ‘मेन कॅरॅक्टर’ नावाचा तिसरा लूक, उबदार ऑबर्न ब्राउन्ससह अशा लोकांसाठी आहे जे कुठेही गेले की, आपली उपस्थिती दाखवतात.

नवीन हेअर कलर कलेक्शनच्या उद्घाटनासह, व्हाइबच्या माध्यमातून तंत्रज्ञान सेमिनारद्वारे गोदरेज प्रोफेशनल देशभरातील 1000 हून अधिक सलून व्यावसायिकांना कौशल्य शिकवण्यास सज्ज आहे. या लॉन्चची सुरुवात म्हणून, पहिला कौशल्यवृद्धी कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता, ज्यात 200 हून अधिक हेअरस्टायलिस्ट, सलून व्यावसायिक आणि सलून मालकांनी सहभाग घेतला.

व्हाइबच्या लॉन्चवर भाष्य करताना, गोदरेज प्रोफेशनलच्या बिझनेस हेड, भूमिका गोयल म्हणाल्या, “व्हाइब कलेक्शन हे केसांच्या रंगाचा हा प्रवास अधिक ठळक, अधिक अभिव्यक्त आणि ट्रेंड-आधारित लूककडे, होत असल्याचे दर्शवते. गोदरेज प्रोफेशनलच्या कलर प्ले रेंजद्वारे समर्थित व्हाइब हे जागतिक स्तरावर प्रभावित ग्राहकांसाठी तयार केलेले, जागतिक स्तरावर प्रेरित कलर ट्रेंड्स सलूनना देण्यासाठी डिझाइन केले आहे. या लॉन्चद्वारे, आम्ही १००० हून अधिक सलून व्यावसायिकांना कौशल्यवृद्धी करण्यासाठी व्हाइबला अनेक शहरांमध्ये घेऊन जात आहोत, कारण या श्रेणीची भविष्यातील वाढ ही आपल्यासोबत हेअरस्टायलिंग समुदायाला सक्षम करण्यावर अवलंबून आहे. व्हाइबसारख्या ट्रेंडसेटिंग कलेक्शन्सद्वारे, स्टायलिस्टना नवीनतम तंत्रांनी सुसज्ज करून सलूनचा सहभाग अधिक दृढ करणे आणि आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येक कलर स्टोरीला जिवंत करणाऱ्या सर्जनशील व्यावसायिकांचा गौरव करणे, यावर आमचे लक्ष आहे.”

या लॉन्च इव्हेंटमध्ये गोदरेज प्रोफेशनलचे नॅशनल टेक्निकल हेड, शैलेश मूला यांच्या नेतृत्वाखाली एक सखोल प्रशिक्षण सत्र आणि एक हेअर शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कलेक्शनमधील उत्तम कलर लूक्स आणि जागतिक हेअर एस्थेटिक्सच्या पुढील लाटेला परिभाषित करणारी प्रगत कलरिंग तंत्रे सादर करण्यात आली. सलून व्यावसायिकांना जागतिक कलर ट्रेंड्सना वैयक्तिकृत, मूड-आधारित हेअर ट्रान्सफॉर्मेशनमध्ये रूपांतरित करण्याचे कौशल्य प्रदान करणे हा या सत्राचा उद्देश होता, ज्यामुळे ग्राहकांचा अनुभव आणि त्यांची स्वतःची सर्जनशील कार्यपद्धती दोन्ही उंचावली जाईल. तंत्र-शिक्षण सत्रानंतर, शहरातील सर्वात प्रभावशाली सलून व्यावसायिकांसमोर एका हाय-फॅशन रॅम्पवर व्हाइब कलेक्शन एका धाडसी, दृष्य स्वरूपात सादर करण्यात आले.

गोदरेज प्रोफेशनलचे राष्ट्रीय तांत्रिक प्रमुख, शैलेश मूला म्हणाले, व्हाइब एकाच सत्यावर आधारित आहे: व्हाइब म्हणजे तुमच्यातील भावनिक ऊर्जा आणि तुमच्या केसांच्या रंगाने ती ऊर्जा तुमच्यासोबत आणायला हवी. केऑस मोडमध्ये सकारात्मक आणि कूल टोनचे बेज ब्लॉन्ड टोन आहेत, जे चमकदार, बहुआयामी आणि वैविध्यपूर्ण हालचालींनी जिवंत वाटतात. सॉफ्ट लाँच हा ब्रुनेट्सचा एक शांत मिलाफ आहे, जो सहजपणे रिच दिसतो. मेन कॅरॅक्टर हा ऑबर्न ब्राऊन रंगातील एक ठळक आणि शक्तिशाली लूक आहे, जो जिथे जाल तिथे आपले वर्चस्व गाजवतो. जपानी किंट्सुगी कलेपासून ते कासवाच्या कवचापर्यंत, आपल्या सभोवतालच्या जगातून प्रेरित असलेल्या तंत्रांद्वारे प्रत्येक लूक साकारला गेला आहे. ओळख-आधारित अभिव्यक्तीकडे जागतिक सौंदर्य वेगाने वाटचाल करत आहे आणि भारत रंग कसे कॅरी करेल याचे भविष्य गोदरेज प्रोफेशनल सक्रियपणे घडवत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande