जागतिक मीठ जागरूकता सप्ताह २०२६ : अतिरिक्त मिठाच्या सेवनाबाबत तज्ज्ञांचा इशारा
प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमुळे वाढते सोडियमचे प्रमाण आयोडीनयुक्त मिठाच्या वापरावर भर मुंबई, ३० मे (हिं.स.) : ‘जागतिक मीठ जागरूकता सप्ताह २०२६’ निमित्त आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना आहारातील अतिरिक्त मिठाच्या सेवनाबाबत सावध राहण्याचे आवाहन केले
टाटा मीठ लोगो


प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमुळे वाढते सोडियमचे प्रमाण आयोडीनयुक्त मिठाच्या वापरावर भर

मुंबई, ३० मे (हिं.स.) : ‘जागतिक मीठ जागरूकता सप्ताह २०२६’ निमित्त आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना आहारातील अतिरिक्त मिठाच्या सेवनाबाबत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे रेडी-टू-ईट आणि पॅकेटबंद अन्नपदार्थांचा वापर वाढत असून, त्यातून शरीरात अधिक प्रमाणात सोडियम जात असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

उपलब्ध जागतिक आकडेवारीनुसार, जगभरातील लोक दररोज सरासरी १०.८ ग्रॅम मीठ सेवन करतात. हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुचविलेल्या ५ ग्रॅमपेक्षा कमी या सुरक्षित मर्यादेच्या दुप्पट आहे. विशेष म्हणजे, अतिरिक्त मीठ केवळ स्वयंपाकातील वापरातूनच नव्हे, तर ब्रेड, सीरियल्स, सॉस आणि विविध स्नॅक्ससारख्या प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमधूनही मोठ्या प्रमाणात शरीरात प्रवेश करत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्यास उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्ट्रोक तसेच किडनीच्या आजारांचा धोका वाढतो. याशिवाय, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर यांच्या अभ्यासानुसार महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हाडांच्या आरोग्यावरही अतिरिक्त मिठाचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, भारतात आयोडीनच्या कमतरतेचा प्रश्न अद्यापही सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. थायरॉईडचे कार्य, चयापचय प्रक्रिया आणि मेंदूच्या विकासासाठी आयोडीन आवश्यक असल्याने आयोडीनयुक्त मिठाच्या वापरावर विशेष भर दिला जात आहे. लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी आयोडीन हा अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटक मानला जातो.

या पार्श्वभूमीवर, ‘देश का नमक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा सॉल्टने गेल्या अनेक दशकांपासून भारतीय कुटुंबांमध्ये आयोडीनयुक्त मिठाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कार्य केले आहे. भारतातील पहिले ब्रँडेड आयोडीनयुक्त मीठ म्हणून ओळख असलेल्या या उत्पादनाने प्रत्येक घरापर्यंत योग्य प्रमाणात आयोडीन पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्याने केला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ‘व्हॅक्यूम इव्हॅपोरेशन’ तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले हे मीठ स्वच्छ, मोकळे आणि दैनंदिन वापरासाठी सोयीस्कर असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.तज्ज्ञांच्या मते, मीठ पूर्णपणे टाळणे हा उपाय नसून योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारचे मीठ वापरणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन मर्यादित ठेवत संतुलित आहाराचा अवलंब करावा आणि आयोडीनयुक्त मिठाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande