
मुंबई, 29 मे (हिं.स.)।
अभिनेता अली फजल लवकरच त्याच्या 'राख' या नव्या वेब सीरिजद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. 'मिर्झापूर: द मुव्ही' मधील भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या अलीच्या या नव्या सीरिजचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रे देखील त्याच्यासोबत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 'पाताल लोक' या लोकप्रिय सीरिजसाठी ओळखले जाणारे प्रोसित रॉय यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.
प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये, अली फजल पोलिसांच्या गणवेशात एका तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. ही कथा दोन बेपत्ता किशोरवयीन मुलांच्या शोधाभोवती फिरते, ज्यांच्या गायब होण्यामुळे संपूर्ण शहरात भीती पसरते. निर्मात्यांनी 'दडलेली सत्ये नेहमीच आपला मार्ग शोधतात' या कॅप्शनसह हे पोस्टर शेअर केले आहे. या सीरिजचे लेखन आणि सह-दिग्दर्शन अनुषा नंदकुमार आणि संदीप साकेत यांनी केले आहे.
'राख'चा जागतिक प्रीमियर १२ जून रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे. पोस्टर आणि कथेच्या एका झलकने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या मालिकेत रहस्य, गुन्हेगारी आणि भावनिक नाट्य यांचा प्रभावी मिलाफ पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
----------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर