अनुपम खेर यांच्या 'श्री रामभूमी' चित्रपटाची घोषणा
मुंबई, 29 मे (हिं.स.)। ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या ५५२ व्या चित्रपटाची, ''श्री रामभूमी''ची अधिकृत घोषणा केली आहे. सोशल मीडियावर चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो शेअर केले असून, चित्रीकरण सुरू झाल्याची घोषणाही केली आहे. या प्रोज
Kher


मुंबई, 29 मे (हिं.स.)। ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या ५५२ व्या चित्रपटाची, 'श्री रामभूमी'ची अधिकृत घोषणा केली आहे. सोशल मीडियावर चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो शेअर केले असून, चित्रीकरण सुरू झाल्याची घोषणाही केली आहे. या प्रोजेक्टचे वर्णन सत्य, श्रद्धा आणि मायभूमीची कथा असे करत, अनुपम म्हणाले की याचा एक भाग असल्याचा त्यांना अत्यंत अभिमान वाटतो.

अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये, ते 'रामभूमी' असे चित्रपटाचे शीर्षक लिहिलेला क्लॅपबोर्ड धरलेले दिसत आहेत. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, माझ्या ५५२ व्या चित्रपटाची, 'श्री रामभूमी'ची घोषणा करताना मला प्रचंड आनंद आणि अभिमान वाटतो. प्रत्येक दशक आणि प्रत्येक शतक एक अशी कथा घेऊन येते जी सांगण्याची गरज असते. ही सत्य, श्रद्धा आणि मायभूमीची कथा आहे. अभिनेत्याच्या या भावनिक पोस्टला सोशल मीडियावर चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंह करत आहेत. या चित्रपटात ऋत्विक भौमिक आणि अमृता खानविलकर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या, चित्रपटाची कथा किंवा प्रदर्शनाच्या तारखेबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही, परंतु या घोषणेने प्रेक्षकांमध्ये आधीच मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande