सिद्धरामय्यांचा राजीनामा मंजूर; नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत राहणार काळजीवाहू मुख्यमंत्री
बंगळुरू, 29 मे (हिं.स.)। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी आज अधिकृतपणे स्वीकारला आहे. घटनेतील प्रक्रियेप्रमाणे राज्यपालांनी राजीनाम्यावर स्वाक्षरी केली असून, या संदर्भात राजभवनातून अधिकृत आदेशही जारी क
Karnataka Siddaramaiahs resignation accepted


सिद्धरामय्या


बंगळुरू, 29 मे (हिं.स.)। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी आज अधिकृतपणे स्वीकारला आहे.

घटनेतील प्रक्रियेप्रमाणे राज्यपालांनी राजीनाम्यावर स्वाक्षरी केली असून, या संदर्भात राजभवनातून अधिकृत आदेशही जारी करण्यात आला आहे. तथापि, राज्यात नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत सिद्धरामय्या पुढील दोन ते तीन दिवस कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून पदावर कायम राहतील.

राज्यपाल राजधानीबाहेर असल्याने गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी आपला राजीनामा राज्यपालांच्या विशेष सचिवांकडे सुपूर्त केला होता. सचिवांनी राजीनामा स्वीकारला होता; मात्र घटनात्मक नियमानुसार राज्यपालांची स्वाक्षरी आवश्यक होती.

गुरुवारी रात्री इंदूरहून बंगळुरूला परतलेल्या राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी शुक्रवारी सकाळी राजीनाम्याचा आढावा घेऊन त्याला औपचारिक मंजुरी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande