
नाशिक, 29 मे (हिं.स.)।
: मैत्री करावी, या उद्देशाने तरुणीसह तिच्यासोबत असलेल्या सहा मैत्रिणींना बळजबरीने गाडीत बसवून त्यांना दमबाजी करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी व तिच्यासोबत असलेल्या सहा मैत्रिणी काल (दि. २८) दुपारी २ वाजेच्या सुमारास नांदूर जत्रा लिंक रोडने जात होत्या. त्यावेळी आरोपी दानिश सय्यद (रा. मोरे मळा, सैलानी बाबा दर्गाजवळ, नाशिकरोड) याने फिर्यादीची इच्छा नसताना त्याच्यासोबत मैत्री करावी, या उद्देशाने त्याच्या गाडीमध्ये बसण्यास सांगितले. त्याला नकार दिल्याचा राग आल्याने त्याने फिर्यादीसह तिच्यासोबत असलेल्या सहा मैत्रिणींना गाडी जोरात चालवून घाबरवून अश्लील वर्तन केले, तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला, तसेच आज तुम्हाला कापून टाकतो, असे म्हटल्यानंतर फिर्यादीसह इतर मैत्रिणी गाडीतून खाली उतरल्यानंतर त्यांना चाकूसारखे धारदार घाबरविले. शस्त्र दाखवून या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दानिश सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV