उत्तर प्रदेशात बेतवा नदीवरील बांधकामाधीन पुलाचा स्लॅब कोसळून सहा मजुरांचा मृत्यू
अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती बचाव कार्यासाठी एसडीआरएफ पथक तैनात; जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी लखनौ, 29 मे (हिं.स.)। उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात बेतवा नदीवर बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलाचा स्लॅब आणि शटरिंग शुक्रवारी पहाटे
UP hamirpur 6 dead under construction bridge collapses


UP hamirpur 6 dead under construction bridge collapses


अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

बचाव कार्यासाठी एसडीआरएफ पथक तैनात; जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

लखनौ, 29 मे (हिं.स.)। उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात बेतवा नदीवर बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलाचा स्लॅब आणि शटरिंग शुक्रवारी पहाटे जोरदार वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून सहा मजुरांचा मृत्यू झाला असून, आणखी काही जण मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्यातील ललपुरा परिसरातील परसनी आणि कंडौर गावांदरम्यान बेतवा नदीवर गेल्या तीन वर्षांपासून नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास सर्व मजूर पुलाखाली झोपलेले असताना जोरदार वादळ आणि पावसादरम्यान पुलाची स्लॅब व शटरिंग अचानक कोसळली. दुर्घटनेनंतर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि सेतू निगमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बचाव कार्यासाठी एसडीआरएफला तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत मलब्यातून चिल्ला बांदा येथील लोकेन्द्र (24) पुत्र राधेश्याम निषाद, कुलदीप (21) पुत्र प्रेमचंद्र निषाद, भूरागढ बांदा येथील सावंत (30), स्वासा ललपुरा हमीरपूर येथील सभाजीत (30), पुष्पेन्द्र सिंह (35) आणि अछपुरा ललपुरा येथील राजेश पाल (41) यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मजुरांनी राजेश, कल्लू आणि अवधेश यांच्यासह इतर काही मजूरही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली आहे. बचाव पथकाने पुलाच्या खांबात अडकलेल्या तीन मजुरांना सुरक्षित बाहेर काढले आहे.

ललपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश सरोज यांनी सांगितले की, दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सापडलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, हमीरपूर सदर विधानसभा क्षेत्रात राठ-हमीरपूर राज्य महामार्गाला परसनी, कंडौरमार्गे कुरारा फोरलेन महामार्गाशी जोडण्यासाठी ललपुरा पोलीस ठाणे क्षेत्रातील परसनी आणि कंडौर गावांदरम्यान बेतवा नदीवर हा नवा पूल बांधला जात आहे. या पुलासाठी 7912,24 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या पुलासाठी स्थानिक राज्यसभा खासदार बाबूराम निषाद यांनी मोठा पुढाकार घेतला होता. हा पूल पूर्ण झाल्यानंतर कुरारा ते मिर्झापूर-झाशी महामार्गाशी परसनीकडे जाणारे अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

26 गावांतील दीड लाख ग्रामस्थांना मोठा दिलासा

राज्यसभा खासदार बाबूराम निषाद यांनी सांगितले की, बेतवा नदीवर नवा पूल उभारल्यामुळे परसनी गावासह मौराकांदर, बहरौली डांडा, कलौलीजार, उजनेडी, अछपुरा वहदीना, स्वासा बुजुर्ग, स्वासा खुर्द, कुम्हऊपुर, कुआं डेरा, कंडौर, बैजेमऊ इस्लामपुर, हरेहटा, पतारा, जखेला, नैठी, रिठारी, छानी खुर्द, छानी बुजुर्ग, देवीगंज आदी 26 गावे वेगाने विकसित होतील. त्यांनी सांगितले की, हे ग्रामीण भाग अद्याप विकासाच्या बाबतीत खूप मागासलेले आहेत. शासनाने पुलाच्या बांधकामाला हिरवा कंदील दिला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande