एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही - बच्चू कडू
अमरावती, 03 मे (हिं.स.) | चांदूरबाजार येथे आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी ठाम भूमिका मांडत, “एक
*एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही - बच्चू कडू”*


अमरावती, 03 मे (हिं.स.) | चांदूरबाजार येथे आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी ठाम भूमिका मांडत, “एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही,” असे वक्तव्य केले.

कडू म्हणाले, “हा भगवा आम्ही खांद्यावर घेतला आहे. आता आम्हाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच हवेत.” त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रती निष्ठा दाखवत, “रात्री दोन वाजता सुद्धा दार उघडून उभा राहणारा नेता मी आहे,” असे सांगितले. तसेच “येऱ्या-गैऱ्या नेत्यांना आम्ही कधीच स्वीकारले नाही, पण एकनाथ शिंदे यांना मनापासून स्वीकारले आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. दिव्यांगांसाठी देशातील पहिले स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचे श्रेयही त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिले. याशिवाय कर्जमाफीसारख्या महत्त्वाच्या निर्णयांमध्येही शिंदे यांचा मोठा वाटा असल्याचे कडू यांनी नमूद केले. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande