
अमरावती, 03 मे (हिं.स.) | अमरावती,धामणगाव रेल्वे,वरूड व शे.घाट शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये शनिवारी दिवसभराच्या अती तापमानानंतर रात्री ९ च्या सुमारास सुमारास अचानक वादळाने कहर केला. दुकानाचे फलक, रस्त्यावरील फेरीवाल्यांचे साहित्य, काही ठिकाणी टिनाचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. सोसाट्याच्या वार्यामुळे हवेची गती वाढल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
या वादळामुळे विद्युत वाहिन्या तुटल्याने दोन्ही शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. शे.घाटामध्ये सुद्धा वादळी वार्यासह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. अमरावती शहरात पावणे सात वाजता वादळी पाऊस आला. पावसामुळे हवेत थंडावा पसरला. त्यामुळे नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपात का होईना थंड हवेचा आनंद घेता आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी