पुणे, 04 मे (हिं.स.)। बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार करूणा मुंडे यांना 125 मते मिळाली आहेत, तर अभिजित बिचुकले यांना 121 मते मिळाली आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. या उमेदवारांमध्ये असणारे अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे यांना ८ व्या फेरीअखेर १०० मतांचा आकडा पार करता आला नाही. प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार नसल्याने महायुतीकडून विक्रमी मताधिक्याचा दावा करण्यात आला होता. दोन लाख २३ हजार ७०५ बारामतीकरांनी मतदान केले आहे. या मतदारसंघात तीन लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यापैकी दोन लाख २३ हजार ७०५ मतदारांनी मतदान केले. बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर आहे. २०१९ मध्ये त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे आता विक्रम मोडण्यासाठी एक लाख ६५ हजार २६६ हा जादुई आकडा होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु