नांदेड - दत्तमांजरी गावामध्ये समजूत काढत बालविवाह रोखला
नांदेड, 04 मे (हिं.स.)। तालुक्यातील दत्तमांजरी येथे होणारा बालविवाह गुप्त माहितीच्या आधारे महिला व बालविकास विभागाने तत्काळ कारवाई करत रोखला. दत्तमांजरी येथील अल्पवयीन मुलगी आणि तांदळा येथील मुलगा यांचा विवाह होणार होता. या अनुषंगाने माहूर ठाण्य
नांदेड - दत्तमांजरी गावामध्ये समजूत काढत बालविवाह रोखला


नांदेड, 04 मे (हिं.स.)।

तालुक्यातील दत्तमांजरी येथे होणारा बालविवाह गुप्त माहितीच्या आधारे महिला व बालविकास विभागाने तत्काळ कारवाई करत रोखला.

दत्तमांजरी येथील अल्पवयीन मुलगी आणि तांदळा येथील मुलगा यांचा विवाह होणार होता. या अनुषंगाने माहूर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरद घोडके, ग्रामस्थ व संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने शहानिशा करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित मुलीचे वय केवळ १६ वर्षे ६ महिने १७ दिवस असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा विवाह बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा ठरत असल्याने तो तत्काळ थांबवण्यात

आला. या कारवाईत ग्रामविकास अधिकारी बी. बी. कासदेकर, सहायक पोलिस निरीक्षक शरद घोडके, पोलिस पाटील रितेश केंद्रे, अंगणवाडी सेविका वनिता गजलवार, पोलिस कर्मचारी गजानन चौधरी, सरपंच सुनीता पवार, दत्तमांजरी येथील तंटामुक्ती अध्यक्ष नरसिंह चव्हाण, तांदळा येथील तंटामुक्ती अध्यक्ष प्रभात वानखेडे, ग्रामपंचायत सेवक विलास राठोड यांचा सहभाग होता. संबंधित कुटुंबीयांचे समुपदेशन करून त्यांना कायद्याची जाणीव करून देण्यात आली. भविष्यात असा प्रकार घडणार नाही, यासाठी लेखी हमीपत्र घेण्यात आले. बालविवाहाची माहिती मिळाल्यास तत्काळ चाइल्ड हेल्पलाइन १०९८ वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande