परभणीतील कापसाच्या गाठी पंजाबला रवाना; शेतकऱ्यांना दिलासा
परभणी, 04 मे (हिं.स.)।जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड म्हणून परभणी येथून कापसाच्या गाठींचा मोठा साठा पंजाबकडे रवाना करण्यात आला. पंजाबमधील व्यापाऱ्यांनी परभणीतील उत्कृष्ट प्रतीचा कापूस पाहून संपूर्ण रेल्वे रॅकभर कापसाच्या
अ


परभणी, 04 मे (हिं.स.)।जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड म्हणून परभणी येथून कापसाच्या गाठींचा मोठा साठा पंजाबकडे रवाना करण्यात आला. पंजाबमधील व्यापाऱ्यांनी परभणीतील उत्कृष्ट प्रतीचा कापूस पाहून संपूर्ण रेल्वे रॅकभर कापसाच्या गाठींची खरेदी केली.

ही खरेदी रिशभ स्पिनिंग मिल (जोधन, जि. लुधियाना) व नाहर स्पिनिंग मिल (लालरू, जि. एसएएस नगर) या नामांकित मिल्सकडून करण्यात आली आहे. परभणीतील कापसाची गुणवत्ता आणि मागणी लक्षात घेता व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या व्यवहारामुळे स्थानिक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे रेल्वे विभागालाही लक्षणीय महसूल प्राप्त झाला आहे.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी परभणीतील संबंधित अधिकारी व यंत्रणांनी विशेष परिश्रम घेतले. कापसाच्या गाठींची वेळेत लोडिंग, वाहतूक व्यवस्था आणि समन्वय यशस्वीपणे पार पाडण्यात आला. एकूणच, या घडामोडीमुळे परभणी जिल्ह्यातील कापूस बाजाराला चालना मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande