
छत्रपती संभाजीनगर, 04 मे (हिं.स.)।
आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून मागील २६ वर्षांपासून सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत यंदा शहरात १५५ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात झाला. जमालशा कॉलनीतील नॅशनल शाळेच्या मैदानावर आदर्श एज्युकेशन सोसायटी व आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळातर्फे सोहळ्याचे आयोजन केले होते.
याप्रसंगी नवदांपत्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सत्तार, मौलाना हुजेफा वस्तानवी, मौलाना मोहम्मद नसीम, नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमेर, नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी रईस खान आदींची उपस्थिती होती. 'सध्या लग्नकार्यावर होणारा अनावश्यक खर्च कर्जबाजारीपणा वाढवत आहे. हा खर्च टाळण्यासाठी प्रत्येक समाजाने सामूहिक विवाहाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे,' असे प्रतिपादन सत्तार यांनी यावेळी केले. सोहळ्यात सहभागी सर्व जोडप्यांना आयोजकांतर्फे संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी , राजेंद्र ठोंबरे, डॉ. फेरोज खान यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis