
नाशिक, 04 मे (हिं.स.)।
: माजी राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री महोदय यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात दर बुधवारी गोदावरी नदी काठावरील गौरी पटांगणात
भरणारा भाजीबाजार बुधवार दि. 6 मे 2026 रोजी भरणार नाही. त्याऐवजी हा बाजार गुरुवार दि. 7 मे रोजी भरेल. या बदलाची भाजी विक्रेते, व्यापारी, नागरिक यांच्यासह संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV