वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात विरोधी पक्षाची निदर्शने
कोल्हापूर, 04 मे (हिं.स.)। राज्यात वाढणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विरोधी डाव्या आघाडीसह महाविकास आघाडीच्यावतीने आज कोल्हापूर शहरातील बिंदूचौकात जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत
कोल्हापुरात विरोधी पक्षाची निदर्शने


कोल्हापूर, 04 मे (हिं.स.)। राज्यात वाढणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विरोधी डाव्या आघाडीसह महाविकास आघाडीच्यावतीने आज कोल्हापूर शहरातील बिंदूचौकात जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलीसांनी हाणून पाडला.

राज्यात महिला मुलींसह बालिकांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. लव्ह जिहाद, धर्मांतर, फसवणूकीचे प्रकार घडले आहेत. ते रोखावे यासाठी शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, भाकप, आदी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी बिंदू चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. बिंदुचौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यासाठी आणला होता. तो पोलीसांनी त्वरीत ताब्यात घेतला. यावेळी कार्यकत्यांशी पोलीसांची झटापट झाली.

आंदोलनात शिवसेना उपनेते संजय पवार, विजय देवणे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, भूपाल शेटे, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, अवधूत साळोखे, दिलीप पोवार, व्यंकापा भोसले आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande