डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांना ‘सम्राट कनिष्क’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
परभणी, 04 मे (हिं.स.)। समाजासाठी केलेल्या बहुमूल्य योगदानाची आणि निस्वार्थ सेवेची दखल घेत संबोधी अकादमी, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांना ‘सम्राट कनिष्क राष्ट्रीय पुरस्कार 2026’ देऊन सन्मानित करण्यात आले. महाबोधी महाव
Q


परभणी, 04 मे (हिं.स.)।

समाजासाठी केलेल्या बहुमूल्य योगदानाची आणि निस्वार्थ सेवेची दखल घेत संबोधी अकादमी, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. भीमराव हत्तीअंबीरे यांना ‘सम्राट कनिष्क राष्ट्रीय पुरस्कार 2026’ देऊन सन्मानित करण्यात आले.

महाबोधी महाविहार परिसरातील प्राचीन बोधी वृक्षाच्या छायेत आयोजित महोत्सवानिमित्त ‘डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल बुद्धिस्ट संसद’ आणि ‘महाबोधी चॅरिटेबल ट्रस्ट’ यांच्या वतीने पूज्य भदंत हर्षबोधी महाथेरो व पूज्य भदंत प्रियपाल महाथेरो यांच्याहस्ते हत्तीअंबीरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉ. प्रोंचाई पालवधम्मो, डॉ. सिस्टर मिथिला चौधरी (चेअरपर्सन, डब्लूएबी युथ), सिस्टर तुम (थायलंड), प्रा. गौतम (दिल्ली), राहुल डंबाळे (पुणे), भीमराव वायवळ (परभणी), अॅड. भुक्तरे (हिंगोली) यांसह विविध देशांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान विविध देशांतील सुमारे 3000 भिक्खूंना महासंघदान देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भदंत डॉ. हर्षबोधी महाथेरो यांना त्यांच्या वतीने संघदान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. दरम्यान, या पुरस्काराबद्दल हत्तीअंबीरे यांचे अभिनंदन होत आहे.

बुध्दांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज....

यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. हत्तीअंबीरे यांनी जगात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. 21 व्या शतकात युद्ध करणे अत्यंत धोकादायक असून, ती थांबवण्यासाठी बोधगया हे जागतिक शांततेचे केंद्र बनवून भगवान बुद्धांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महाबोधी विहार परिसरात बुद्ध जयंती अधिक प्रभावीपणे साजरी करण्यासाठी भारत सरकार व बिहार सरकार यांच्यात समन्वय साधण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande