अमरावती जिल्ह्यातील शाळा २६ जून नंतरच
अमरावती, 04 मे (हिं.स.) : राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्टी बाबत व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ बाबत शासनाने २८ एप्रिल रोजी पत्र निर्गमित केले आहे. त्यानुसार उन्हाळी सुट्टी २ मे पासून जाहीर केली असून राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे २०२६-२७ शैक्षणि
जिल्ह्यातील शाळा २६ जून नंतरच सुरू होणार


अमरावती, 04 मे (हिं.स.) : राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्टी बाबत व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ बाबत शासनाने २८ एप्रिल रोजी पत्र निर्गमित केले आहे. त्यानुसार उन्हाळी सुट्टी २ मे पासून जाहीर केली असून राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे २०२६-२७ शैक्षणिक सत्र १५ जूनपासुन सुरु करण्यात यावेत, असे नमूद केले आहे. परंतु विदर्भातील तीव्र उष्णतेचा विचार करता दरवर्षी प्रमाणे विदर्भातील शाळेची तारिख दरवर्षी वेगळीच असते. त्याप्रमाणेच यावर्षीही २६ नंतरच सुरु करण्यात याव्यात. अशा सूचना देण्यात आल्या आहे.

विदर्भातील तापमानात जून महिन्यात ४५ ते ४६ डिग्री सेल्सिअस असते. तीव्र उष्णतेचा विचार करता विद्यार्थ्यांना उष्माघातासारख्या धोक्यापासून वाचविण्याकरिता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन विदर्भातील प्राथमिक माध्यमिक शाळा २६ जून नंतरच सुरु करण्यात याव्यात. अशा सूचना शालेय शिक्षण मंत्रालयाकडून शिक्षण संचालकांना पाठविण्यात आलेल्या आहे. यामध्ये विदर्भातील शाळांकरिता स्वातंत्र्य लेखी आदेश निर्गमित करावे. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande