
परभणी, 04 मे (हिं.स.)।
ब्राह्मण समाजाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी शामभाऊ झाडगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारणीत विविध पदांवर नवीन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली आहे. समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि विविध उपक्रम राबविण्यासाठी ही कार्यकारिणी कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले. नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी झाडगांवकर, उपाध्यक्षपदी स्वप्नील गुंडू, कार्याध्यक्षपदी संजय जोशी भोगावकर, सचिवपदी अजय कोकिळ यांची निवड झाली आहे. सहसचिव म्हणून राहुल दलाल, तर कोषाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मीकांत कुलकर्णी आणि सहकोषाध्यक्षपदी दुर्गादास उन्हाळे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून मुकेश दलाल, नारायण जोशी, सुमित दलाल, सीताराम पांडे आणि रघुनंदन कुलकर्णी यांचा समावेश आहे.
तसेच मार्गदर्शक मंडळात अॅड. अनिरुद्ध पांडे, चंद्रगुप्त भंडारी, विशाल दलाल, राजेंद्र पोतदार, गोविंद जोशी, रंगनाथ कुलकर्णी, सखाराम जोशी, बाळासाहेब कुलकर्णी आणि प्रसाद जोशी यांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन कार्यकारिणीमार्फत समाजहिताचे विविध उपक्रम, शैक्षणिक व सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे राबविले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis