
परभणी, 04 मे (हिं.स.)। नसरापूर येथे 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा शिवसेना शिंदे गटाने निषेध व्यक्त करत दोषीवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोमवार 4 मे रोजी जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेनेचे महानगर प्रमुख माणिक पोंढे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पानपट्टे, उपतालुका प्रमुख बाळासाहेब मोहटे, अशोक गव्हाणे, डॉ. धर्मराज चव्हाण, रामा कुलथे, आकाश सुरजोशे, शंकर फुलमोगरे, गणेश खूपसे, मारुती डोंबे आदींसह शिवसैनिकांनी जिल्हाप्रशासनास एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, 1 मे 2026 रोजी घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय असून महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच अशी अमानुष घटना घडल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक मूल्यांना तडा देणार्या या प्रकाराचा निषेध करत पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, दोषीवर जलदगती न्यायप्रक्रियेअंतर्गत कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis