रत्नागिरी : आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निधीतून शाळांना सोलार पॅनल
रत्नागिरी, 04 मे (हिं.स.) । राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि रत्नागिरी या तालुक्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनलचे वाटप आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून करण्यात आले. कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या
शाळांना सोलर पॅनेल


रत्नागिरी, 04 मे (हिं.स.) । राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि रत्नागिरी या तालुक्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनलचे वाटप आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून करण्यात आले.

कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून हे वाटप झाले. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीत रा. गो. जागुष्टे विद्यालयात हा कार्यक्रम झाला. शाळांना मिळणारे वेतनेतर अनुदान अत्यंत तुटपुंजे आहे. अनेक शाळांना वीजबिल भरण्यासाठीसुद्धा पैसे नसतात, दुर्गम डोंगराळ भागामध्ये वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असतो. या सर्वांचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सौरऊर्जेला प्राधान्य देण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले.

राजापूर तालुक्यातील १६ शाळा, लांजा १६, संगमेश्वर १५ शाळा आणि रत्नागिरी तालुक्यातील १६ शाळांना अशा ६३ शाळांना सुमारे १ कोटी ६० लाखाचे सोलर सिस्टिम साहित्य वाटप करण्यात आले. हे साहित्य बसविण्यासाठी पॅनल बॅटरी यूपीएस आणि वायरिंग फिटिंगसाठी साहित्य घेऊन शाळांना दिले जाणार आहे. सोलर पॅनल सिस्टीम बसवल्यानंतर, त्याची निगा आणि देखरेख याविषयी माहिती देण्यात आली. उर्वरित शाळांना दुसऱ्या टप्प्यात सोलर पॅनल देण्यात येतील, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

यावेळी रत्नागिरी जिल्हा भाजपा सरचिटणीस ओंकार फडके, रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, लांजा तालुकाध्यक्ष विराज हरमळे, लांजा तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, मनोज पाटणकर, नीलेश आखाडे, रा गो जागुष्टे शाळेच्या कार्याध्यक्ष दाक्षायणी बोपर्डीकर, आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande