
पुणे, 04 मे (हिं.स.) : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, पहिल्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ६५०० मतांची आघाडी घेतली आहे. तर सात फेरी पुर्ण झाल्या नंतर सुनेत्रा पवारांना 61,917 मतानी आघाडी घेतली आहे
बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह राहिल्याने सुमारे ५८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीत ७१.८६ टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात तीन लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यापैकी दोन लाख २४ हजार ८७ मतदारांनी मतदान केले. टपाली मतदान आणि मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ६५०० मतांची आघाडी घेतली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने २३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकाही उमेदवार नाही. नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे सोलापूरमधील आर. वाय घुटूकडे आणि हिंदुस्थान जनता पार्टीचे जत येथील सतीश कदम हे दोन उमेदवार आहेत. उर्वरित २१ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामध्ये बारामतीतीलच आठजण, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावातील एक अपक्ष उमेदवार, धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांचा समावेश आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु