
रायगड, 04 मे (हिं.स.) : पुण्यातील बाल लैंगिक अत्याचाराच्या 2 घटनांच्या निषेधार्थ पुणे-सातारा मार्गावर तीव्र आंदोलन करण्यात
आले. नागरिकांनी या दोन्ही घटनांचा निषेध नोंदवत कडकडीत बंद पाळला.पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर दुसरीकडे चाकणमधील खालुंब्रे परिसरात एका चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.या अमानुष घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. नसरापूर परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, नागरिकांनी निषेध मोर्चाही काढला. राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)