सेलूत विविध संघटनांद्वारे नरसापुर घटनेचा तीव्र शब्दात निषेध
परभणी, 04 मे (हिं.स.)। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथील 3 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन तीचा निर्घृण खून केल्याच्या प्रकरणातील आरोपी भिमाजी कांबळे यास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सेलू येथील विविध संघटनांनी महसूल प्रशासनास सादर
Q


परभणी, 04 मे (हिं.स.)।

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथील 3 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन तीचा निर्घृण खून केल्याच्या प्रकरणातील आरोपी भिमाजी कांबळे यास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सेलू येथील विविध संघटनांनी महसूल प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.

ज्येष्ठ नागरीक सेवा संघ, शांतीदूत परिवार शाखा सेलू व शाम ए सरगम संगीत परिवार यांच्या वतीने सोमवारी उपजिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठविण्यात आले. त्याद्वारे नरसापूर येथील त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. डी.बी. मुळे, शामसुंदर आढे, डी.के. कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी, उपेंद्र बेल्लूरकर, अशोक वावनरे यांच्यासह अन्य यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, बहुभाषिक संघटना सेलू, महिला संघटना सेलू, नागरी संघटना सेलू यांच्या वतीनेही यावेळी प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले व घटनेचा निषेध करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande