‘आमचेही फटकारे’ या चित्र, अर्कचित्र आणि व्यंगचित्र प्रदर्शनातून उलगडणार
पुणे, 04 मे (हिं.स.)। शिवसेनाप्रमुख आणि ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील विविध पैलू ‘आमचेही फटकारे’ या चित्र, अर्कचित्र आणि व्यंगचित्र प्रदर्शनातून उलगडणार आहेत. जागतिक व्यंग्यचित्रकार दिन हा 5 मे रोजी साजरा केला जाणार
hgfdgh


पुणे, 04 मे (हिं.स.)।

शिवसेनाप्रमुख आणि ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील विविध पैलू ‘आमचेही फटकारे’ या चित्र, अर्कचित्र आणि व्यंगचित्र प्रदर्शनातून उलगडणार आहेत. जागतिक व्यंग्यचित्रकार दिन हा 5 मे रोजी साजरा केला जाणार आहे.

यानिमित्ताने कार्टून्स कट्टा, महाराष्ट्र व्यंग्यचित्रकार ग््रुाप आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मंगळवारी (दि. 5) आणि बुधवारी (दि.6) आयोजित या प्रदर्शनातून ठाकरे यांच्यावरील चित्रे, अर्कचित्रे रसिकांना पाहायला मिळणार आहेत.

ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभरातील चित्रकार-व्यंगचित्रकारांनी आपापल्या चित्रशैलीतून ठाकरे यांच्यावरील चित्रे आणि अर्कचित्रे हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. सोबतच ठाकरे यांनी स्वत: रेखाटलेली काही निवडक व्यंगचित्रेही रसिकांना पाहायला मिळतील.

हे प्रदर्शन जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व कलादालनात सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (दि. 5) सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनात 120 चित्रकारांनी रेखाटलेली ठाकरे यांच्यावरील निवडक 200 चित्रे व अर्कचित्रे पाहायला मिळतील. यासोबतच दोन दिवस निमंत्रित चित्रकार आणि व्यंग्यचित्रकारांची चित्र प्रात्यक्षिके आणि चर्चासत्रांचे आयोजनही केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande