नसरापूर प्रकरण : आरोपीला फाशी द्या, राष्ट्रवादीचे (शप) पुण्यात आंदोलन
पुणे, 04 मे (हिं.स.)। पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, समाजमनात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
hgf


पुणे, 04 मे (हिं.स.)। पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, समाजमनात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि नराधम आरोपीला कठोर शासन व्हावे, या मागणीसाठी ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरद पवार)’ पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे, नगरसेवक गफूरभाई पठाण, युवक अध्यक्ष किशोर कांबळे, दिपक जगताप, युसुफ शेख, सुवर्णा सावर्डे, दिपाली कवडे, विद्या म्हात्रे, जयश्री आदमाने तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नसरापूर येथे झालेली घटना दुर्दैवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या अघोरी कृत्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कायद्याचा धाक उरला नाही, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande