छ.संभाजीनगर : अपर्णा गिते यांना पोलिस महासंचालक पदक प्रदान
छत्रपती संभाजीनगर, 06 मे (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील महावितरणच्या कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) अपर्णा गिते यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित केले. अपर्णा गिते यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच स
छ.संभाजीनगर : अपर्णा गिते यांना पोलिस महासंचालक पदक प्रदान


छत्रपती संभाजीनगर, 06 मे (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील महावितरणच्या कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) अपर्णा गिते यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित केले. अपर्णा गिते यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सार्वजनिक हितासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) या पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांनी वीजचोरी रोखणे, अंमलबजावणी व सुरक्षा यंत्रणेत समन्वय साधणे आणि विभागात शिस्तबद्ध कार्यक्षमता आणण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अंमलबजावणी व सुरक्षा विभागाने विविध महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीपणे राबवल्या आहेत. गिते यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महावितरण प्रशासनाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अपर्णा गिते या पदकाने गौरवण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande