
अमरावती, 06 मे, (हिं.स.)। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बनावट साबन, आणि डिटर्जेंट बनवणाऱ्या शहरातील २ अवैध कारखान्यावर धाड टाकत मोठापर्दाफाश केला. याकारवाईत ७१ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. वलगांव पोलिस स्टेशन अंतर्गत चांदूर बाजार रोड स्थित नवीन अकोला परीसरात ही धक्कादायक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीहाबनावटकारखाना चालवत होते आणिकिरकोळविक्रेत्यांना बनावटमालविकत होते.
प्राप्त माहितीनुसार, पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या सूचनेनुसार शहरातील अवैध व्यवसायांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. मंगळवारी रात्री गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनावलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदूर बाजार रोडवरील नया अकोला परिसरात बनावट साबण आणि डिटर्जंटची अवैध निर्मिती होत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे, पथकाने छापा टाकून दोन अवैध कारखाने उध्वस्त केले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात तयार साबन, डिटर्जेंट पावडर, माल, कच्चा माल आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. पोलीस आयुक्त राकेश ओला, डीसीपी गणेश शिदे, शाम घुगे, रमेश धुमाळ आणि एसीपी शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पीआय संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मनीष वाकोडे, पोलीस निरीक्षक सतीश देशमुख, मंगेश लोखंडे, गजानन थेवले, मनोज ठोसर, प्रशांत मोहोड आणि विशाल वाकपंजर यांनी ही कारवाई केली.
चार आरोपींची नावे जाहीर
या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. जुनैद खान यासीन खान (२८, पाकिझा कॉलनी), प्रफुल्ल विष्णुपंत डोईफोडे (४८, न्यू म्हाडा कॉलनी), शेख भुरू शेख मुनीर (५०, झेंडा चौक) आणि शेख कलीम शेखमाजीद (४०, बिस्मिल्लानगर, लालखडी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.तपासात असे उघड झाले आहे की, आरोपींकडे असा कारखाना चालवण्यासाठी वैध परवाना नव्हता.
परवान्याशिवाय चालणाऱ्यायबेकायदेशीर कारखान्याने अंदाजे गेल्या महिन्यात काळाबाजाराचे सत्र सुरू होते.एका गुप्तमाहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सध्या असे समजले आहे की, संबंधित बँड कंपन्यांचे अधिकारी अमरावती येवून गोळा केलेल्या नमुन्यांची तपासणी करतील. यानंतर, आरोपींवर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. हा बनावट माल कुठून आणला जात होता आणि कोणत्या बाजारपेठांमध्ये त्याचा पुरवठा केला जात होता, याचा तपास पोलीस आता करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी