
- ४ लाख ८५ हजार क्षेत्रावर होणार सोयाबीनचा पेरा, मूग उडिदामध्ये होणार वाढ
लातूर, 06 मे (हिं.स.)।
मे महिन्याच्या पहिला आठवडा नुकताच सुरू झाला आहे. सद्यस्थितीत शेतकरी बांधव आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख ९५ हजार ५८३ हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत साधारणतः ४००० हेक्टर क्षेत्र वाढणार आहे. यामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात सोयाबीनचाच पेरा सर्वाधिक होणार असून ४ लाख ८५ हजार ६६४ हेक्टरवर सोयाबीनचे क्षेत्र प्रस्तावित आहे. तर दुसरीकडे उडिद आणि मूगाचे क्षेत्रही काही अंशी वाढणार आहे.
लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्धा प्रमाणात पेरणी केली जाते. सद्यस्थिती जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी खरीपूर्व हंगामाला वेग दिला आहे. शेतशिवार ही नांगरणी करताना शेतकरी बांधव दिसत आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, खरीप ज्वारी, तूर, मूग, उडिद आणि कापासाची लागवड केली जाते. यामध्ये नगदी पिक असलेल्या सोयाबीनचे प्रमाण सर्वाधिक असते. यंदाही सोयाबीनने आपले पहिले स्थान कायम ठेवली असून ४ लाख ८५ हजार ६६४ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार आहे. दरम्यान सद्यस्थिती सोयाबीनला मिळालेला कमी भाग पाहता गतवर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत साधारणतः २००० हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र घटणार आहे. तर मूग आणि उडिद हे सरासरी २०० हेक्टरने वाढणार आहे. एकिकडे शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीस सज्ज झालेला असताना दुसरीकडे कृषि विभागानेही खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. खरीप हंगाम २०२६ साठी आवश्यक खते, बियाण्यांचे नियोजन करण्यात येत आहे. कृषि विभागाच्या वतीने आगामी खरीप हंगामासाठी १ लाख ४९ हजार मे. टन खतांची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत जिल्ह्यात ७२ हजार ८१५ मे. टन खत शिल्लक आहे. त्याबचबरोबर बियाणांची उपलब्धतेसाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis