अमरावती - मतदार यादीचे काम करणाऱ्यास मारहाण
अमरावती, 06 मे, (हिं.स.)। मतदार यादीचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मार खावा लागल्याची घटना गाडगेनगर पोलिस्-गांच्या हद्दीत कांतानगर येथे घडली. शासकीय तंत्रनिकेतन मध्ये निदेशक म्हणून काम करणाऱ्या सुरेश सोनाजी लोखंडकर (वय ४७, रा सिध्दी
अमरावती - मतदार यादीचे काम करणाऱ्यास मारहाण


अमरावती, 06 मे, (हिं.स.)। मतदार यादीचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मार खावा लागल्याची घटना गाडगेनगर पोलिस्-गांच्या हद्दीत कांतानगर येथे घडली. शासकीय तंत्रनिकेतन मध्ये निदेशक म्हणून काम करणाऱ्या सुरेश सोनाजी लोखंडकर (वय ४७, रा सिध्दी विनायकनगर) यांची मतदार यादीच्या मॅपींगची डयुटी लावण्यात आली आहे.

याअंतर्गत ते कांतानगर येथे डीजी रेसीडेन्सीमध्ये सर्वेक्षणासाठी गेले होते. तेथे एका फ्लॅटमध्ये महिलेकडून माहिती घेत असताना, तिचा पती आला आणि पत्नीशी काय बोलतो, असे म्हणत शिविगाळ करुन मारहाण केली. तसेच त्यांच्या वाहनाला धक्का देऊन अंदाजे पाच हजार रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी लोखंडकर यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विनोद पांडुरंग भावे याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande