इमरान यांच्या पक्षातील चार नेत्यांना हिंसाचार प्रकरणी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा
इस्लामाबाद , 21 जून (हिं.स.)।पाकिस्तानातील एका न्यायालयाने शनिवारी तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षातील चार वरिष्ठ नेत्यांना २०२३ मधील दंगलीशी संबंधित प्रकरणात प्रत्येकी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तर, माजी परराष
इमरान यांच्या पक्षातील चार नेत्यांना हिंसाचार प्रकरणी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा


इस्लामाबाद , 21 जून (हिं.स.)।पाकिस्तानातील एका न्यायालयाने शनिवारी तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षातील चार वरिष्ठ नेत्यांना २०२३ मधील दंगलीशी संबंधित प्रकरणात प्रत्येकी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तर, माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

९ मे २०२३ रोजी माजी क्रिकेटपटू आणि नंतर राजकारणात प्रवेश केलेले इम्रान खान यांना अटक करण्यात आल्यानंतर पाकिस्तानभर, विशेषतः पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतांमध्ये हिंसक आंदोलन उसळले होते. आंदोलकांनी अनेक लष्करी तळ आणि सरकारी इमारतींची तोडफोड केली होती.

पंजाबचे माजी राज्यपाल उमर सरफराज चीमा, पंजाबच्या माजी आरोग्यमंत्री डॉ. यास्मिन राशिद, पंजाबचे माजी मंत्री मियाँ मेहबूबुर रशीद आणि माजी खासदार एजाज चौधरी यांना लाहोरमधील मुगलपुरा परिसरात पोलिसांच्या वाहनांवर हल्ला करून ती जाळल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.

या प्रकरणातील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली होती. दहशतवादविरोधी न्यायालयाचे (एटीसी) न्यायाधीश मंझर अली गिल यांनी शनिवारी या चारही नेत्यांना प्रत्येकी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande