अमेरिकेसोबतच्या चर्चेसाठी मिनाबच्या शहीदांना स्मरून गालिबाफ स्वित्झर्लंडमध्ये दाखल
बर्न, 21 जून (हिं.स.)।इराणच्या संसदेचे अध्यक्ष एमबी गालिबाफ यांनी स्वित्झर्लंडमध्ये अमेरिकेसोबत होणाऱ्या तांत्रिक चर्चेपूर्वी मिनाब शाळा दुर्घटनेतील बळींचे स्मरण केले. त्यांनी सांगितले की, या शहीदांचे बलिदान वॉशिंग्टनसोबतच्या चर्चेदरम्यान इस्लामिक
अमेरिकेसोबतच्या चर्चेसाठी मिनाबच्या शहीदांना स्मरून गालिबाफ स्वित्झर्लंडमध्ये दाखल


बर्न, 21 जून (हिं.स.)।इराणच्या संसदेचे अध्यक्ष एमबी गालिबाफ यांनी स्वित्झर्लंडमध्ये अमेरिकेसोबत होणाऱ्या तांत्रिक चर्चेपूर्वी मिनाब शाळा दुर्घटनेतील बळींचे स्मरण केले. त्यांनी सांगितले की, या शहीदांचे बलिदान वॉशिंग्टनसोबतच्या चर्चेदरम्यान इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या भूमिकेला दिशा देणारे ठरेल. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान झालेल्या १४ कलमी सामंजस्य कराराच्या (एमओयू) अनुषंगाने ही चर्चा आयोजित करण्यात आली आहे.

एक्सवरील एका पोस्टमध्ये गालिबाफ यांनी म्हटले की, ते आणि इराणी प्रतिनिधीमंडळ चर्चेची तयारी करत असताना मिनाबमधील मुलांच्या आणि इतर इराणी शहीदांच्या आठवणी सोबत घेऊन पुढे जात आहेत. ते म्हणाले, “मिनाबमधील निरपराध मुलांना आणि प्रिय इराणच्या सर्व शहीदांना मी माझ्या प्रत्येक कृतीत आणि वर्तनात, प्रत्येक क्षणी माझ्याकडे पाहताना अनुभवतो. ते आमच्याकडे पाहत आहेत आणि आमच्याकडून अपेक्षा ठेवत आहेत. देव करो, मी कधीही निरपराध शहीदांना आणि इराणच्या जनतेला लाज आणणार नाही.”त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘#Minab168’ हा हॅशटॅग वापरत हा संदेश मिनाब शाळेतील मुलांच्या स्मृतीला समर्पित केला.

दरम्यान, सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर अमेरिकेसोबतच्या पहिल्या तांत्रिक चर्चेसाठी इराणचे प्रतिनिधीमंडळ स्वित्झर्लंडमधील झ्युरिख येथे दाखल झाले आहे.इराणच्या सरकारी प्रसारण संस्थाच्या माहितीनुसार, या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व एमबी गालिबाफ करत आहेत. या शिष्टमंडळात परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची, सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयातील आंतरराष्ट्रीय व्यवहारांचे उपप्रमुख अली बाघेरी, केंद्रीय बँकेचे गव्हर्नर अब्दोलनासेर हेम्मती, उप तेलमंत्री आणि नॅशनल इराणियन ऑइल कंपनीचे अध्यक्ष हमीद बोर्डे, उप परराष्ट्रमंत्री काझेम गरीबाबादी तसेच परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत.

अमेरिकेने कूटनीतिक करारांतर्गत दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि त्यावर पुढील कार्यवाही करणे, हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रतिनिधीमंडळाचे सदस्य आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी प्रस्थानापूर्वी सांगितले की, चर्चेचा मुख्य भर आधीच निश्चित करण्यात आलेल्या बांधिलक्यांच्या अंमलबजावणीवर असेल. वृत्तानुसार, बघाई म्हणाले, “कोणत्याही कराराची किंवा सहमतीची खरी कसोटी त्याच्या अंमलबजावणीच्या वेळीच लागते.”ते पुढे म्हणाले की, दुसऱ्या बाजूकडून कराराच्या पालनावर इराण बारकाईने लक्ष ठेवणार असून, भूतकाळातील अपूर्ण राहिलेल्या आश्वासनांचा अनुभव लक्षात घेऊन पुढील पावले उचलली जातील.इस्माईल बघाई म्हणाले, “दुसऱ्या पक्षाकडून वचनभंग झाल्याचे आमचे अनुभव लक्षात घेता, त्यांच्या बांधिलक्यांची पूर्तता अत्यंत गांभीर्याने पुढे नेणे आवश्यक आहे.”

प्रतिनिधीमंडळ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचल्यानंतर तेथील परराष्ट्र मंत्रालयाने (एमएफए) त्यांचे स्वागत केले आणि अमेरिका-इराण सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले. स्विस परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “स्वित्झर्लंडमध्ये इराणी प्रतिनिधीमंडळाच्या आगमनाचे आम्ही स्वागत करतो. अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेअंतर्गत हे प्रतिनिधीमंडळ बुर्गेनस्टॉककडे रवाना होत आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande