महिला टी२० विश्वचषक: ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौड कायम, पाकिस्तानचा ११३ धावांनी उडवला धुव्वा
लीड्स, 24 जून (हिं.स.) : ऑस्ट्रेलियाने महिला टी२० विश्वचषकात पाकिस्तानला ११३ धावांनी पराभूत करत आपला सलग चौथा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले. एलिस पेरीने ७१ धावा केल्या आणि दोन बळी घेतले. लीड्स येथे खेळल्या गेलेल्या सा
ऑस्ट्रेलियाचा महिला  क्रिकेट संघ


लीड्स, 24 जून (हिं.स.) : ऑस्ट्रेलियाने महिला टी२० विश्वचषकात पाकिस्तानला ११३ धावांनी पराभूत करत आपला सलग चौथा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले. एलिस पेरीने ७१ धावा केल्या आणि दोन बळी घेतले. लीड्स येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १९९/७ अशी मोठी धावसंख्या उभारली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बेथ मूनीच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला, पण त्यानंतर एलिस पेरी आणि जॉर्जिया वोल यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. या दोघींनी अवघ्या ५६ चेंडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. वॉलने ३९ धावा केल्या, तर पेरीने ४८ चेंडूंमध्ये ७१ धावांची शानदार खेळी केली. अखेरीस, ऍनाबेल सदरलँड (२७) आणि निकोला कॅरी (२६) यांनी झटपट धावा करत धावसंख्या १९९ पर्यंत पोहोचवली.

प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ अवघ्या ८६ धावांवर सर्वबाद झाला. मुनीबा अलीने सर्वाधिक ३२ धावा केल्या, पण बाकीचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. पाकिस्तानच्या डावाला तीन धावबादांचाही फटका बसला. पेरीने एकाच षटकात दोन बळी घेतले, तर कर्णधार सोफी मोलिन्यू आणि सदरलँड यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले.

चार सामन्यांत चार विजय मिळवूनही, ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरीतील स्थान अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेले नाही. दक्षिण आफ्रिका आणि भारत हे संघही प्रत्येकी चार विजय मिळवून या विक्रमाची बरोबरी करू शकतात. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना रविवारी लॉर्ड्सवर भारताविरुद्ध होईल. ऑस्ट्रेलियन कर्णधार सोफी मोलिन्यू म्हणाली, आमच्याकडे पर्याय आणि क्रिकेकटपटूंची संख्या आहे आणि संघ चांगल्या स्थितीत आहे. पण, अजूनही आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande