हिंगोली-अनुदान व बीजभांडवल योजनांसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
हिंगोली, 24 जून (हिं.स.) : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (मर्या), हिंगोली यांना सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेअंतर्गत 22 तर बीजभांडवल योजनेअंतर्गत 18 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या दोन्ही योजना राष्ट्रीयकृ
हिंगोली-अनुदान व बीजभांडवल योजनांसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन


हिंगोली, 24 जून (हिं.स.) : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (मर्या), हिंगोली यांना सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेअंतर्गत 22 तर बीजभांडवल योजनेअंतर्गत 18 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकांमार्फत राबविण्यात येत असून चांभार, ढोर, मोची व होलार समाजातील पात्र अर्जदारांकडून विविध व्यवसायांसाठी कर्जप्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच महामंडळाच्या नियमानुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्जप्रस्ताव तीन प्रतींमध्ये स्वतः उपस्थित राहून सादर करावेत. त्रयस्थ अथवा मध्यस्थामार्फत प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

कर्जप्रस्तावासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्रे, रेशनकार्ड, आधारकार्ड/मतदार ओळखपत्र/पॅनकार्ड, व्यवसायाचे कोटेशन, व्यवसायस्थळाचा पुरावा, बीजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहन व्यवसायासाठी परवाने व लायसन्स, ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र, सिबिल स्कोअर, तांत्रिक पात्रता व अनुभव प्रमाणपत्र तसेच अनुदान न घेतल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करून सादर करावीत.

महामंडळाच्या विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत) जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली येथे स्वीकारण्यात येणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील चांभार, ढोर, मोची व होलार समाजातील बेरोजगार युवक-युवती तसेच होतकरू व गरजू अर्जदारांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande