बीड - विलास घुले हत्या प्रकरणात ८ आरोपींना अटक; पुरवणी जबाब नोंदवला
बीड, 24 जून (हिं.स.)। केज येथील विलास घुले हत्याप्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी पोलीस ठाण्यात आंदोलकांशी संवाद साधला. अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक असलेल्या या घटनेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत नऊ पैकी आठ आरोपींना अटक केली आहे, तर उर
बीड - विलास घुले हत्या प्रकरणात ८ आरोपींना अटक; पुरवणी जबाब नोंदवला


बीड, 24 जून (हिं.स.)। केज येथील विलास घुले हत्याप्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी पोलीस ठाण्यात आंदोलकांशी संवाद साधला. अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक असलेल्या या घटनेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत नऊ पैकी आठ आरोपींना अटक केली आहे, तर उर्वरित एका आरोपीला लवकरच गजाआड केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलीस अधीक्षकांनी पीडित कुटुंबाची आणि फिर्यादींची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. घटनेच्या दिवशी धक्का बसल्यामुळे फिर्यादींना ज्या गोष्टी सांगता आल्या नव्हत्या, त्या सर्व बाबी पुरवणी जबाबामध्ये नोंदवून घेण्यात आल्या आहेत. तसेच, माने यांच्या तक्रारीवरून ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला असून, दोन्ही प्रकरणांवर कडक कारवाई सुरू आहे.

पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, पुराव्यांच्या आधारावर तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या प्रकरणात कोणताही भेदभाव केला जाणार नाही आणि तपासातील प्रत्येक सत्य समोर आणले जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande