अमरावतीतही फायर ऑडिटला ‘खो’
मोजक्याच कोचिंग क्लासेसकडून नियमांचे पालन अमरावती, 24 जून (हिं.स.) : लखनौमधील अग्नितंडवात १५ जणांचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली असून त्यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अमरावती शहरातही तशाच पद्धतीचा धोका कायम आहे. केवळ चार ते पाच नामां
अमरावतीतही फायर ऑडिटला ‘खो’


मोजक्याच कोचिंग क्लासेसकडून नियमांचे पालन

अमरावती, 24 जून (हिं.स.) : लखनौमधील अग्नितंडवात १५ जणांचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली असून त्यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अमरावती शहरातही तशाच पद्धतीचा धोका कायम आहे. केवळ चार ते पाच नामांकित कोचिंग समूह वगळता अन्य लहान कोचिंगसेंटर्स कडून फायर आडिटच करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

उत्तरप्रदेशच्या लखनौ येथील तीन मजली इमारतीला सोमवारी भीषण आग लागून १५ जणांचा मृत्यु झाला होता. त्यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ज्या इमारतीमध्ये अग्नीताडंव झाले त्या इमारतीमध्ये प्रशिक्षण संस्थांचाही समावेश होता. अमरावती शहरात सुद्धा अनेक ठिकाणी लहान मोठी कोचिंग क्लासेस व प्रशिक्षण संस्था सुरु आहेत. त्यापैकी बहुतांश संस्था या इमारतींमध्ये आहे. बहुतांश संस्थांकडून अद्यापही फायर आडिट करण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे, मात्र काही कोचिंग तसेच प्रशिक्षण संस्था या बहुमजली इमारतीमध्ये असून इमारत निर्मितीच्या वेळीच त्याचे फायर आडिट केले जाते, त्यामुळे अशा संस्थांना स्वतंत्रपणे फायर आडिटची आवश्यकता नसल्याचे अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु अनेक संस्थांच्या स्वतःची इमारती आहे, मात्र त्यांचे फायर आडिट करण्याबाबत अग्निशामक विभागाकडे कुठलीही मागणी करण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात अमरावती मनपाच्या अग्निशमन विभागाचे अधीक्षक अजय पंधरे म्हणाले की, अमरावती शहरातील मोजक्या, नामांकित कोचिंग संस्थांकडून वेळोवेळी फायर आडिटची प्रक्रिया पूर्ण केली जाते, मात्र अनेक संस्थांकडून अद्यापही फायर ऑडिटची मागणी आमच्याकडे करण्यात आलेली नाही. मल्टिप्लेक्स किंवा कॉम्पलेक्स निर्मिती करतानाच फायर ऑडिट केले जाते. त्याशिवाय परवानगी दिली जात नसल्याचे त्यांनी

सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande