संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
बीड, 24 जून (हिं.स.)। बीड येथील विशेष मोक्का न्यायालयाने केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याचा दोषमुक्तीचा अर्ज मंगळवारी फेटाळून लावला. आपल्यावरील आरोप तथ्यहीन असून या गंभीर गुन्ह्यातून दोषमुक्त करावे,
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला


बीड, 24 जून (हिं.स.)। बीड येथील विशेष मोक्का न्यायालयाने केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याचा दोषमुक्तीचा अर्ज मंगळवारी फेटाळून लावला. आपल्यावरील आरोप तथ्यहीन असून या गंभीर गुन्ह्यातून दोषमुक्त करावे, अशी याचिका आरोपीच्या वकिलांनी दाखल केली होती. मात्र, सरकारी पक्षाचे सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी या अर्जाला न्यायालयात प्रखर विरोध दर्शवला. न्यायालयाने दोन्ही बाजू तपासून पाहत विष्णू चाटेचा हा अर्ज नामंजूर केला. याच प्रकरणातील दुसरा आरोपी जयराम चाटे यानेही जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून, त्याच्या जामीन अर्जावर आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पुढील नियमित सुनावणीवर आता २९ जून रोजी न्यायालयात एकत्रित सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या आगामी सुनावणीकडे लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande