नांदेड - खा.अजित गोपछडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट
नांदेड, 24 जून, (हिं.स.)। नांदेड–बिदर महामार्गांतर्गत देगलूर ते कर्नाटक सीमा भागातील रस्त्याच्या उन्नतीकरणासाठी बजेट मंजुरी मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची खासद
अ


नांदेड, 24 जून, (हिं.स.)। नांदेड–बिदर महामार्गांतर्गत देगलूर ते कर्नाटक सीमा भागातील रस्त्याच्या उन्नतीकरणासाठी बजेट मंजुरी मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी सदिच्छा भेट घेतली. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आणि सीमावर्ती भागाच्या विकासाला गती दिल्याबद्दल त्यांचे विशेष स्मृतिचित्र प्रदान करून मनःपूर्वक आभार मानले.

ते म्हणाले, गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या मार्गाचा आता कायापालट होणार असून, स्थानिक नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि लाखो भाविकांचा प्रवास सुखकर व सुरक्षित होणार आहे. हा विकासाचा मार्ग असाच पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande