
बीड, 24 जून (हिं.स.)।दीपा मुधोळ-मुंडे, आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सोबत जिल्हाधिकारी, बीड यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उभारण्यात येत असलेल्या संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिगृहाची पाहणी केली.
यावेळी संबंधित ठेकेदार तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. वसतिगृहाच्या उर्वरित कामांचा आढावा घेऊन ते काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
ऊसतोड कामगारांच्या मुलांना दर्जेदार निवास व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, वसतिगृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis