फिफा विश्वचषक २०२६ : दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच विश्वचषकाच्या बाद फेरीत
मेक्सिको, २५ जून, (हिं.स.) दक्षिण आफ्रिकेने फिफा विश्वचषक २०२६ मध्ये दक्षिण कोरियाला १-० ने मात करत प्रथमच बाद फेरीमध्ये प्रवेश करत इतिहास रचला. मेक्सिकोच्या मॉन्टेरी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ''अ'' गटाच्या सामन्यात थापेलो मासेकोच्या दुसऱ्या ह
दक्षिण आफ्रिकेचा फुटबॉल संघ


मेक्सिको, २५ जून, (हिं.स.) दक्षिण आफ्रिकेने फिफा विश्वचषक २०२६ मध्ये दक्षिण कोरियाला १-० ने मात करत प्रथमच बाद फेरीमध्ये प्रवेश करत इतिहास रचला.

मेक्सिकोच्या मॉन्टेरी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 'अ' गटाच्या सामन्यात थापेलो मासेकोच्या दुसऱ्या हाफमधील गोलने दक्षिण आफ्रिकेला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला.

२०१० च्या विश्वचषकानंतर प्रथमच या स्पर्धेत खेळणारा दक्षिण आफ्रिका संघ, सलामीच्या सामन्यात मेक्सिकोकडून ०-२ ने पराभूत झाल्यानंतर स्पर्धेतून जवळपास बाहेरच मानला जात होता. पण, त्यांनी चेक प्रजासत्ताकविरुद्ध सामना बरोबरीत सोडवून पुनरागमन केले आणि त्यानंतर दक्षिण कोरियाला पराभूत करत ३२ संघांच्या फेरीत प्रवेश केला.

दक्षिण कोरियाने सामन्याची सुरुवात आक्रमकपणे केली. कर्णधाराच्या जागी संघाचे नेतृत्व करणाऱ्या किम मिन-जाएचा एक जोरदार हेडर गोल रेषेवर अडवण्यात आला, तर ली कांग-इनचा प्रयत्न गोलपोस्टच्या अगदी जवळून बाहेर गेला.

दक्षिण आफ्रिकेने हळूहळू खेळावर नियंत्रण मिळवले, पण गोल करण्यात त्यांची कमजोरी दिसून आली. ३० व्या मिनिटाला, एव्हिडन्स माकगोपाला एक सोपी संधी मिळाली, पण तो गोलकीपर किम सेउंग-ग्यूला चकवून गोल करू शकला नाही आणि त्यांना आघाडी घेण्याची सुवर्णसंधी मिळाली.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला, दक्षिण कोरियाने एक धाडसी निर्णय घेतला. आणि आपला स्टार फुटबॉलपटू आणि कर्णधार सोन ह्युंग-मिनला मैदानात उतरवले. असे असूनही, संघाला यश मिळवता आले नाही.

६३ व्या मिनिटाला, दक्षिण आफ्रिकेला ती संधी मिळाली ज्याची ते वाट पाहत होते. थापेलो मासेकोने त्शेपांग मोरेमीच्या क्रॉसवर अप्रतिम गोल करत चेंडू जवळच्या पोस्टच्या आत पाठवला आणि आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

गोल स्वीकारल्यानंतर, दक्षिण कोरियाने बरोबरी साधण्याचा खूप प्रयत्न केला, पण दक्षिण आफ्रिकेचा गोलकीपर रॉनवेन विल्यम्स आणि बचावपटूंनी त्यांना कोणतीही संधी दिली नाही.

या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने नॉकआऊट फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे, जिथे ते २८ जून रोजी लॉस एंजेलिसमध्ये सह-यजमान कॅनडाचा सामना करतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande