राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाची दैदिप्यमान कामगिरी
डोंबिवली, 25 जून (हिं.स.)। : इंदूर येथे आयोजित राष्ट्रीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये महाराष्ट्र संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत सलग १२ व्या वर्षी अपराजित राहण्याचा मानाचा विक्रम कायम ठेवला. महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणा
महाराष्ट्र


डोंबिवली, 25 जून (हिं.स.)। : इंदूर येथे आयोजित राष्ट्रीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये महाराष्ट्र संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत सलग १२ व्या वर्षी अपराजित राहण्याचा मानाचा विक्रम कायम ठेवला. महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डोंबिवली पलावा येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.

या ऐतिहासिक यशामागे ठाणे जिल्हाध्यक्ष डॉ. शुभम मिश्रा यांचे प्रभावी नेतृत्व आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांनी टीम महाराष्ट्रचे नेतृत्व करत खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवून दिले. या स्पर्धेत अविका जैन - सुवर्णपदक, विराज सुभेदार - रौप्यपदक, तरुषी सिजित – रौप्यपदक , साश्वत मोदी –कांस्यपदक, अभा दरेकर – कांस्यपदक, अवनी केडिया – कांस्यपदक , अद्विक माझिला–कांस्यपदक मिळवत आपली नवीन ओळख निर्माण केली.

या शानदार यशाबद्दल महाराष्ट्र भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि संपूर्ण संघाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेळाडूंची जिद्द, मेहनत आणि शिस्त यामुळे महाराष्ट्र संघाने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा कायम राखला आहे. या यशामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील गौरवशाली परंपरेत आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला गेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande