'मिर्झापूर : द मूव्ही'चा दमदार टीझर प्रदर्शित
मुंबई, 25 जून, (हिं.स.)। लोकप्रिय क्राईम फ्रँचायझी ''मिर्झापूर'' आता मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. निर्माता फरहान अख्तरच्या ''एक्सेल एंटरटेनमेंट''ने बहुप्रतिक्षित चित्रपट ''मिर्झापूर: द मूव्ही''चा एक दमदार टीझर प्रदर्शित केला
'मिर्झापूर: द मूव्ही'चा दमदार टीझर प्रदर्शित


मुंबई, 25 जून, (हिं.स.)। लोकप्रिय क्राईम फ्रँचायझी 'मिर्झापूर' आता मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. निर्माता फरहान अख्तरच्या 'एक्सेल एंटरटेनमेंट'ने बहुप्रतिक्षित चित्रपट 'मिर्झापूर: द मूव्ही'चा एक दमदार टीझर प्रदर्शित केला आहे. हा टीझर ॲक्शन, रक्तपात, सत्तेचा संघर्ष आणि सूडाच्या भावनेने ओतप्रोत भरलेल्या कथेची झलक दाखवतो. विशेष म्हणजे, प्रेक्षकांचे आवडते पात्र कालीन भैया, गुड्डू पंडित आणि मुन्ना भैया पुन्हा एकदा त्यांच्या आयकॉनिक अवतारात यात पाहायला मिळत आहेत.

टीझरची सुरुवात कालीन भैयाच्या एका संवादाने होते. योग्य वारसदार मिळणे कठीण असते आणि कधीकधी तर तो मिळतच नाही. त्यानंतर गुड्डू पंडितचे वर्चस्व आणि मिर्झापूरच्या गादीसाठी चाललेला संघर्ष यांची झलक पाहायला मिळते. अली फजल, पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, रसिका दुगल आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार या चित्रपटात आपल्या प्रसिद्ध भूमिका पुन्हा साकारत आहेत. याव्यतिरिक्त, रवी किशन आणि जितेंद्र कुमार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार असून, त्यांची पात्रे कथानकात एक नवीन वळण आणणार आहेत.

मिर्झापूरमधील सत्तेचा संघर्ष यापूर्वीपेक्षा अधिक रक्तरंजित आणि धोकादायक असेल, हे या टीझरवरून स्पष्ट होते. सत्ता, विश्वासघात आणि सूडाची ही गाथा भव्य स्तरावर सादर केली जात आहे. 'एक्सेल एंटरटेनमेंट'च्या बॅनरखाली निर्मित आणि गुरमीत सिंग दिग्दर्शित 'मिर्झापूर: द मूव्ही' हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande