वटपौर्णिमा, पाऊस आणि समर-स्वानंदीच्या नात्याला लाभला दुग्धशर्करा योग – तेजश्री प्रधान
मुंबई, 26 जून, (हिं.स.)। पावसाळ्याच्या आगमनासोबत महाराष्ट्रात सण-उत्सवांची चाहूल लागते. या सणांपैकी सर्वप्रथम येणारा महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा . या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाच
स्वानंदी


मुंबई, 26 जून, (हिं.स.)। पावसाळ्याच्या आगमनासोबत महाराष्ट्रात सण-उत्सवांची चाहूल लागते. या सणांपैकी सर्वप्रथम येणारा महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा . या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत करतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीत या सणाला विशेष महत्त्व आहे. आपल्या आवडत्या मालिकांमधील आवडती पात्रेही हा सण खास पद्धतीने साजरा करताना दिसणार आहेत. *'वीण दोघातली ही तुटेना'* मालिकेत समर आणि स्वानंदी यांची वटपौर्णिमा कशी साजरी करणार यासाठी मालिकेचे येणार भाग पाहावे लागणार आहेत. समर आणि स्वानंदी यांच्या नात्यात आता एक नवा टप्पा येणार आहे. समर स्वानंदीला फिरायला एका मोकळ्या माळ रानावर फिरायला घेऊन जाणार . ती जागा पाहून स्वानंदी खूप आनंदी होते. दुसऱ्या सरप्राईजसाठी समर तिला एका प्लांट नर्सरीमध्ये घेऊन जातो. तिथे समरने सुंदर फुलं आणि छोट्या रोपांच्या मदतीने *'आई लव्ह यू'* असं लिहिलं आहे. समर आपल्या मनातील भावना स्वानंदीसमोर व्यक्त करणार आहे. आता यावर स्वानंदीच काय उत्तर असणार? समर स्वानंदी त्या माळ रानावर एकत्र वृक्षारोपण करणार आहेत. स्वानंदीने अजूनही त्याच्या प्रेमाला उत्तर दिलेले नसल्यामुळे समर म्हणतो, जर आपल्या नात्यात तसे काही नाही, तर वटपौर्णिमेची पूजा करू नका. आता वटपौर्णिमेच्या दिवशी समर येतील का, याची स्वानंदीला चिंता आहे. मात्र इथे स्वानंदीला एक सुखद धक्का बसणार आहे. तिथे आधीच आलेला समर इतर महिलांसोबत वडाच्या झाडाची पूजा करतोय. हे पाहून स्वानंदीच्या आनंदाला पारावार राहत नाही. समरच्या शब्दांनी भारावून गेलेली स्वानंदी आपलं प्रेम व्यक्त करेल ? दोघे मिळून वडाच्या झाडाची पूजा करतील? आणि त्यांच्या नात्याची नवीन सुंदर सुरुवात होईल ?

*वटपौर्णिमेच्या विशेष प्रसंगाच्या चित्रीकरणाबद्दल सांगताना तेजश्री प्रधान म्हणाली* मालिकेत ज्या महत्त्वाच्या टप्प्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि त्याचसोबत पावसाचीही आपण सगळे वाट पाहत होतो. या दोन्ही गोष्टी एकत्र येणं म्हणजे जणू दुग्धशर्करा योगच होता. त्या सुंदर वातावरणात वटपौर्णिमेचा सीन शूट करताना खूप मजा आली. गेले तीन-चार महिने प्रचंड उष्णतेत शूटिंग सुरू होतं. त्यामुळे हा पावसाचा गारवा आणि ओलावा आम्हा कलाकारांसोबतच टेक्निशियनससाठीही खूप गरजेचा होता. सामान्यतः पावसात शूटिंग करताना चिखल, साडी खराब होणं किंवा इलेक्ट्रिकल उपकरणांमुळे तंत्रज्ञांना होणाऱ्या अडचणी अशा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पण यावेळी मुंबईतल्या पहिल्या पावसामुळे सेटवरील प्रत्येकजण आनंदी होता आणि सगळे उत्साहाने काम करत होते. जसा महाराष्ट्रातील प्रत्येकाला पाऊस पाहून आनंद झाला, तसाच आनंद 'वीण दोघांतली ही तुटेना' च्या प्रेक्षकांनाही समर आणि स्वानंदीचा हा खास क्षण पाहताना मिळेल.

निसर्गाने इतकी सुंदर साथ दिली की सगळंच अगदी छान जुळून आलं. समर आणि स्वानंदी एकमेकांबद्दलच्या भावना कधी व्यक्त करणार आहेत. ते प्रेमात कधी पडणार, याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. लेखकांनी अतिशय सुंदर प्रसंग लिहिले आहेत आणि आम्ही ते तितक्याच प्रामाणिकपणे साकारले. प्रत्येक प्रसंगातील भावना वेगळी होती. एक कलाकार म्हणून त्या भावना अचूकपणे साकारणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान होतं.

दुसरीकडे, *'सनई चौघडे'* मालिकेत वटपौर्णिमा खास पद्धतीने साजरी होताना पाहायला मिळणार आहे. मात्र, मालिकेत जेव्हा जेव्हा सण साजरे होतात, तेव्हा काही ना काही धक्कादायक घडतंच आणि यावेळीही तसंच काहीसं घडणार आहे. जय खानोलकर एका मोठ्या संकटात अडकणार असून, त्याला त्या संकटातून शर्वरी कशी बाहेर काढते, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.

*आसावरीची भूमिका साकारणारी जुई गोगरी हिने या विशेष भागाच्या चित्रीकरणादरम्यान आलेल्या आव्हानांबद्दल सांगितले...* पावसाळ्यात शूटिंग करणं खरंच खूप आव्हानात्मक असतं. मी वसईहून ठाण्याला शूटसाठी प्रवास करते. त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीच्या अनेक अडचणी येतात. रस्त्यांवर पाणी साचतं, लोकल ट्रेन उशिरा येतात. मी वसईहून मिरा रोडपर्यंत ट्रेनने जाते आणि तिथून सेटवर कॅबने करते. त्यामुळे सर्वात प्रथम सकाळची ६.३० वाजताची कॉल टाइम गाठणं हेच एक मोठं आव्हान असतं.तरीही पावसात शूटिंग करण्याची एक वेगळीच मजा असते. प्रवासात भिजणं, चिखल आणि इतर अडचणी असल्या तरी हवामान खूप सुंदर असतं. आणि पाऊस पडताना पडद्यावर प्रत्येक दृश्य अधिक सुंदर दिसतं.आमच्या वटपौर्णिमेच्या प्रसंगात मी झोपाळ्यावर बसलेली आहे आणि गौतम मला झोका देत आहे, पावसात रोमँटिक प्रसंग खूप सुंदर दिसून येतात . पण या सगळ्यामागे संपूर्ण टीमचं खूप कष्ट असतात. पावसात सगळं भिजत असल्यामुळे विशेषतः वायरिंग आणि इलेक्ट्रिकल उपकरणांची काळजी घ्यावी लागते. कलाकार म्हणूनही अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतात. मेकअप, केस आणि लूक कायम ठेवणं कठीण होतं. पावसामुळे केस फ्रीझी होतात , मेकअप खराब होतो आणि सतत टचअप करावा लागतो.

वटपौर्णिमेच्या प्रसंगात बहुतेक अभिनेत्री साडीत होत्या. त्यामुळे चिखल लागणार नाही, कपडे खराब होणार नाहीत याचीही विशेष काळजी घ्यावी लागली. ओले कपडे आणि सततचा पाऊस यामुळे थोडी चिडचिड होऊ शकते, पण ती बाजूला ठेवून प्रसंगातील भावना तितक्याच प्रभावीपणे सादर कराव्या लागतात.रोमँटिक प्रसंग पावसात शूट करणं हे जितकं सुंदर दिसतं, तितकंच ते आव्हानात्मकही असतं. पण आमची संपूर्ण टीम खूप सहकार्य करणारी आहे. कलाकार, टेक्नीशियन आणि प्रॉडक्शन टीमने एकमेकांची उत्तम काळजी घेतली. त्यामुळे कोणतीही परिस्थिती असली तरी शूटिंग करणं सोपं झालं.पावसात शूटिंग करतानाचा अनुभव खूप सुंदर होता. आम्ही मनापासून हा भाग साकारला आहे आणि प्रेक्षकांना हे सर्व प्रसंग नक्की आवडतील, अशी आशा आहे.

समर आणि स्वानंदी आणि आसावरी-गौतमाचे या प्रेमळ क्षणांचा आणि खास वटपौर्णिमा सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'वीण दोघातली ही तुटेना', दररोज संध्या ७:३० वाजता, आणि 'सनई चौघडे' रात्री ८.३० वा सदैव तुमच्या झी मराठी वर .

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande