चंद्रपूर : पाच वर्षीय चिमुरडीवर वृद्धाकडून अत्याचार
चंद्रपूर, 28 जून (हिं.स.)। एका पाच वर्षीय चिमुरडीवर ६५ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ वर्षीय पीडित मुलगी आणि तिच्या १२ वर्षीय बहिणीच्या घरासमोरील पार्किंग परिसर
चंद्रपूर : पाच वर्षीय चिमुरडीवर वृद्धाकडून अत्याचार


चंद्रपूर, 28 जून (हिं.स.)। एका पाच वर्षीय चिमुरडीवर ६५ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५ वर्षीय पीडित मुलगी आणि तिच्या १२ वर्षीय बहिणीच्या घरासमोरील पार्किंग परिसरात खेळत असता शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीने घराच्या बाल्कनीतून पीडितेला आइसक्रीम खाण्यास बोलावले. वृद्ध व्यक्ती मुलीला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिचे लैंगिक शोषण केले. काही वेळानंतर बहीण अद्याप आली नाही म्हणून बहिणीला आवाज दिला व घरी आणले. तेव्हा पीडितेने घटनेची माहिती कुटुंबियांना सांगितली. पीडितेचे बोलणं ऐकून आईने तात्काळपणे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.संबंधित गंभीर प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी वृद्ध पुरुषाला ताब्यात घेतले आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande