
रायगड, 28 जून (हिं.स.)। अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायदा तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ ते २७ जून २०२६ या कालावधीत आरोपीने पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्या अज्ञानाचा व असुरक्षिततेचा फायदा घेत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर गोरेगाव पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.
तपासादरम्यान पुरावे संकलित करून आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर २८ जून २०२६ रोजी पहाटे १२.५४ वाजता आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९२/२०२६ नोंद करण्यात आला असून पॉक्सो अधिनियम, २०१२ मधील कलम ४ व ६ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ६४(१), ६४(२)(m), ६४(२)(i) आणि ६५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)