अमरावती -शिरजगाव कसबा पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती, 28 जून (हिं.स.)।अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत शिरजगाव कसबा पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत १ लाख १६ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांना ताब्यात घ
शिरजगाव कसबा पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त


अमरावती, 28 जून (हिं.स.)।अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत शिरजगाव कसबा पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत १ लाख १६ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार शनिवारी रात्री शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार शेतातील खुल्या जागेत काही जण 'एक्का बादशाह' नावाचा पैशांचा जुगार खेळत असल्याचे समोर आले. पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकताच काही जणांनी पळ काढला. घटनास्थळी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर सहा जण फरार झाले.कारवाईदरम्यान ५२ पत्त्यांचा संच, रोख रक्कम, आरोपींकडील रोकड, दोन मोबाईल फोन आणि तीन दुचाकी असा एकूण १,१६,०८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमाच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमन सिरसट, पोउपनि प्रशांत जाधव आणि त्यांच्या पथकाने केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande