कर्जत तालुक्यात स्फोटकामुळे पाळीव कुत्रा ठार, एकास अटक
रायगड, 28 जून (हिं.स.)। : कर्जत तालुक्यातील असलपाडा (मुठे) येथील फार्महाऊस परिसरात जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवण्यात आलेल्या संशयित स्फोटक पदार्थाचा स्फोट होऊन एका पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नेरळ पोल
Shocking incident in Karjat taluka; pet dog killed by explosives, one arrested.


Shocking incident in Karjat taluka; pet dog killed by explosives, one arrested.


रायगड, 28 जून (हिं.स.)। : कर्जत तालुक्यातील असलपाडा (मुठे) येथील फार्महाऊस परिसरात जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवण्यात आलेल्या संशयित स्फोटक पदार्थाचा स्फोट होऊन एका पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नेरळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असलपाडा येथील मुठे यांच्या फार्महाऊसच्या मागील कंपाउंड परिसरात ही घटना घडली. फिर्यादी हे मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील रहिवासी असून ते कॅम्पिंगसाठी या परिसरात आले होते. त्यांचा पाळीव कुत्रा फार्महाऊसच्या मागील बाजूस फिरत असताना अज्ञात व्यक्तीने जंगली प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने ठेवलेला संशयित स्फोटक पदार्थ त्याने चावला. त्यानंतर झालेल्या भीषण स्फोटात कुत्र्याच्या तोंडाचे गंभीर तुकडे होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेचे काही दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे नेरळ पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयिताची ओळख पटवून २७ जून २०२६ रोजी रात्री ११.११ वाजता त्याला अटक करण्यात आली.

या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२५ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम, १९०८ चे कलम ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande