
परभणी, 29 जून (हिं.स.) : मराठवाडा एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी चंद्रकांत शेंदुरकर या छत्रपती संभाजीनगर येथून नांदेडकडे जाणाऱ्या मराठवाडा एक्सप्रेसने प्रवास करत होत्या. रात्री सुमारे साडेनऊ वाजता गाडी मानवत रोड रेल्वे स्थानकावर पोहोचली.
स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर ट्रेनचा वेग कमी असताना अज्ञात व्यक्तीने खिडकीतून हात घालून महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर परभणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis